नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (४ नोव्हेंबर) ३०९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ४१६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात केवळ एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९४ हजार ६२१ झाली आहे. ८९ हजार ६३२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ३०६ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७३, ग्रामीण भागातील १३०, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील १ जणांचा समावेश आहे. तर, नाशिक शहरातील एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६२ हजार ५९५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७६२. पूर्णपणे बरे झालेले – ५९ हजार ४८७. एकूण मृत्यू – ८७०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.०३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार १३९. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ५९०. एकूण मृत्यू – ६०९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.२९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १६७. पूर्णपणे बरे झालेले -३ हजार ८८१. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी