नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२२ ऑगस्ट) ४१२ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. तर, दिवसभरात ९१२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला
शनिवारी दिवसभरात नाशिक शहरात एकूण ६२९ जण नव्याने कोरोना बाधित झाल्याचे समोर आले. तर, दोन जणांचा नाशिक शहरात कोरोनाने मृत्यू झाला. शहरात एकूण १०८९ प्रतिबंधित क्षेत्र आहेत. शहरात आजवर १९ हजार ७१२ जण कोरोना बाधित झाले आहेत. तर, आतापर्यंत ४२६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत १६ हजार ६५५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या शहरात २ हजार ६३१ रुग्ण उपचार घेत आहेत.
ग्रामीण भागात २५२, मालेगाव शहरात २९ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी दिवसभरात मालेगाव शहरात १ आणि ग्रामीण भागात ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या ७६१ झाली आहे.
शहरासह जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २९ हजार ३३५ एवढी झाली आहे. तर, आतापर्यंत २३ हजार ७७७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्यांची टक्केवारी ८१ एवढी आहे.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी
नाशिक २५७
बागलाण १३४
चांदवड ४४
देवळा ५६
दिंडोरी ५०
इगतपुरी ७२
कळवण ५०
इगतपुरी ७२
कळवण २०
मालेगाव १८८
नांदगाव ११९
निफाड २७०
पेठ २
सिन्नर २२०
सुरगाणा ६
त्र्यंबकेश्वर २१
येवला २८
एकूण १४८७