नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२ डिसेंबर) ४०३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २०८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार ८२२ झाली आहे. ९६ हजार ९९६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार २२ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १९३, ग्रामीण भागातील १९१, मालेगाव शहरातील १४ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६७ हजार ०९१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७१८. पूर्णपणे बरे झालेले – ६४ हजार ५८५. एकूण मृत्यू – ९१०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५९६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ५२४. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ५७३. एकूण मृत्यू – ६८०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २७१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३४९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०४७. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी