( आकडेवारी मंगळवार सकाळी ११ पर्यंत )
– ३० हजार ४३८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी २४ हजार ६९८ रुग्णांना डिस्चार्ज
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ४ हजार ९५५ पॉझिटिव्ह रुग्ण
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८१.१४ टक्के, मृत्यू ७८५
—
नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील २४ हजार ६९८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४ हजार ९५५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ७८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २ हजार ७१२,
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ६९३
ग्रामीण भाग – १ हजार ५४१
जिल्ह्याबाहेरील – ०९
एकूण – ४ हजार ९५५
नाशिक ग्रामीण
नाशिक – २७३
चांदवड – २८
सिन्नर – २१५
दिंडोरी- ५१
निफाड – २७०
देवळा – ४४
नांदगांव – ११३
येवला – ४१
त्र्यंबकेश्वर – २२
सुरगाणा – ०६
पेठ – ०२
कळवण – १३
बागलाण – १४३
इगतपुरी – ११७
मालेगांव ग्रामीण – २०३
ग्रामीण भागात – एकूण १ हजार ५४१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
–
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७६.८३, टक्के, नाशिक शहरात ८४.५० टक्के, मालेगाव मध्ये ६५.३२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.९५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८१.१४ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण २१५, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४४२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १०६ व जिल्हा बाहेरील २२ अशा एकूण ७८५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.