नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१७ डिसेंबर) १५५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३८९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ६ हजार ३१५ झाली आहे. १ लाख १ हजार ३०७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८९४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ११४ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३५, ग्रामीण भागातील १६, मालेगाव शहरातील १ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ८ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६९ हजार ८७२. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६५०. पूर्णपणे बरे झालेले – ६६ हजार ८८०. एकूण मृत्यू – ९४७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ०४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.७२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ०३०. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ३६८. एकूण मृत्यू – ७३१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.६४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४६७. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १६३. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी