नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१२ डिसेंबर) ३१८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३७४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ५ हजार ११४ झाली आहे. ९९ हजार ७८० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ४७६ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १८४, ग्रामीण भागातील १०८, मालेगाव शहरातील २४ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६९ हजार ०९१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६७५. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ९९५. एकूण मृत्यू – ९३१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार १६५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.५२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ६४९. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ८१२. एकूण मृत्यू – ७११.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १२६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.०१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४४४. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ११७. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी