नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (७ डिसेंबर) ३७२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात अवघ्या एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ३ हजार ५६० झाली आहे. ९८ हजार ४३९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार २९१ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २५०, ग्रामीण भागातील १०४, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागातील एकाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६८ हजार १६६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७४७. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ३४७. एकूण मृत्यू – ९२१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ८९८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.८६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ०९९. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार १८५. एकूण मृत्यू – ६९५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २१९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.६४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३९७. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०७८. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी