नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (६ डिसेंबर) ३७१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३११ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख २ हजार ९१९ झाली आहे. ९७ हजार ८०० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार २९३ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २१४, ग्रामीण भागातील १४३, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६७ हजार ७८१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७१६. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ०५६. एकूण मृत्यू – ९२०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ८०५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.९८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ८९०. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ८६१. एकूण मृत्यू – ६९२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ३३७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३७६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०७०. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी
नाशिक १७९
बागलाण १३७
चांदवड ७२
देवळा ३९
दिंडोरी १०१
इगतपुरी १४
कळवण २६
मालेगाव २५
नांदगाव १०९
निफाड ३०९
पेठ ००
सिन्नर २९१
सुरगाणा ५
त्र्यंबकेश्वर २२
येवला ८