नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१९ डिसेंबर) ३१५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३६४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ६ हजार ९०९ झाली आहे. १ लाख २ हजार १४० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८६५ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २०१, ग्रामीण भागातील १०३, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ०१ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील २, ग्रामीण भागातील ३ तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७० हजार २५४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६०५. पूर्णपणे बरे झालेले – ६७ हजार ४०४. एकूण मृत्यू – ९५०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ९००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.९४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार २२१. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ६५०. एकूण मृत्यू – ७३७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८३४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.९७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४७९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १८०. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी