नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (३ ऑक्टोबर) ८६६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३६४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७९ हजार २८० झाली आहे. ६८ हजार ४०९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ९ हजार ४४४ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ४४७, ग्रामीण भागातील ३५५, मालेगाव शहरातील ५० तर जिल्ह्याबाहेरील १४ जणांचा समावेश आहे. तर, १७ मृतांमध्ये नाशिक शहरातील ९, ग्रामीण भागातील ७ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ५३ हजार ४१७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४८ हजार ५१९. एकूण मृत्यू – ७५९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार १३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९०.८३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २१ हजार ५००. पूर्णपणे बरे झालेले – १६ हजार २४२. एकूण मृत्यू – ४८०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ७७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.५४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ८३१. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार २६४. एकूण मृत्यू – १५७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४१०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.२०
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी