नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (३१ ऑक्टोबर) २२८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३६२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९३ हजार ६७१ झाली आहे. ८८ हजार ००६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ९९५ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १२९, ग्रामीण भागातील ८७, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ९७६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७६५. पूर्णपणे बरे झालेले – ५८ हजार ४९७. एकूण मृत्यू – ८६७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ६१२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.३९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ८३२. पूर्णपणे बरे झालेले – २४ हजार ९८८. एकूण मृत्यू – ५९९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १४७. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८५९. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)