नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२ जानेवारी) २७९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३४४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १० हजार ६२५ झाली आहे. १ लाख ६ हजार ९७६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९७४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ६७५ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७५, ग्रामीण भागातील ८७, मालेगाव शहरातील १२ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, २ मृतांमध्ये नाशिक शहरातील दोघांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७२ हजार ६८१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८६. पूर्णपणे बरे झालेले – ७० हजार ६७०. एकूण मृत्यू – ९८०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.२३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ३३७. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ०९१. एकूण मृत्यू – ७७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५८८. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २६०. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी