नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (२९ नोव्हेंबर) ३४२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २०७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एका जणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ७७० झाली आहे. ९६ हजार ०१८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ९६६ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १९९, ग्रामीण भागातील १२८, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, एकमेव मृत हा ग्रामीण मधील आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६६ हजार ४५२. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५२६. पूर्णपणे बरे झालेले – ६३ हजार ९५७. एकूण मृत्यू – ९०२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५९३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार १५३. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार २४७. एकूण मृत्यू – ६७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २३६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३२६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०४२. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी