नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२३ डिसेंबर) ३३० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३३९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ८ हजार १४९ झाली आहे. १ लाख ३ हजार ६२५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ५९६ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २१७, ग्रामीण भागातील १०२, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७१ हजार ००५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५८६. पूर्णपणे बरे झालेले – ६८ हजार ५८३. एकूण मृत्यू – ९६२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ४६०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.५९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ६६०. पूर्णपणे बरे झालेले – २९ हजार ९३०. एकूण मृत्यू – ७४५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.५४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५१२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १९४. एकूण मृत्यू – १७४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी