नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (७ नोव्हेंबर) २४१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३१७ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९५ हजार ३५१ झाली आहे. ९० हजार ७९६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८५६ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६३, ग्रामीण भागातील ७२, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील १ जणांचा समावेश आहे. तर, नाशिक ग्रामीण मधील ३ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार ०७७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६२९. पूर्णपणे बरे झालेले – ६० हजार २८८. एकूण मृत्यू – ८७४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ९१५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.५८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ३६२. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९३२. एकूण मृत्यू – ६१९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८११. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.७७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १८६. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८९३. एकूण मृत्यू – १६८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.००
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी