नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (३ नोव्हेंबर) १६५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ३०५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९४ हजार ३१२ झाली आहे. ८९ हजार २१६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ४१७ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३९, ग्रामीण भागातील २२ आणि मालेगाव शहरातील ४ जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६२ हजार ४२२. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७७२. पूर्णपणे बरे झालेले – ५९ हजार २६४. एकूण मृत्यू – ८६९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २८९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.९४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ००९. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ४००. एकूण मृत्यू – ६०६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ००३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.०४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १६२. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८८०. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी