नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (३ डिसेंबर) ३०२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २१५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख २ हजार १२४ झाली आहे. ९७ हजार २११ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार १०० जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात २०७, ग्रामीण भागातील ८१, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, ९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६७ हजार २९८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७५५. पूर्णपणे बरे झालेले – ६४ हजार ७५५. एकूण मृत्यू – ९१५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६२८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ६०५. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार ६११. एकूण मृत्यू – ६८४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ३१०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३५६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०४७. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी