नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (१२ जानेवारी) ११४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २९२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १२ हजार ७८९ झाली आहे. १ लाख ९ हजार ३६५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०१६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ४०८ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ९१, ग्रामीण भागातील २२, मालेगाव शहरातील ०१ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार १०१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४२७. पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार २५४. एकूण मृत्यू – ९९६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८५१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.५१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ९७२. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ७६३. एकूण मृत्यू – ७९६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४१३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.३३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६५३. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३३८. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी