नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (१८ नोव्हेंबर) २०८ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २९२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९७ हजार ५१९ झाली आहे. ९३ हजार ३७० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ४०८ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १४०, ग्रामीण भागातील ५०, मालेगाव शहरातील १६ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ ग्रामीण भागातील ३ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार ४८९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४२१. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ०३३. एकूण मृत्यू – ८८७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५६९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ०१९. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ६३१. एकूण मृत्यू – ६४२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७४६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी -९५.०५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २४६. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९९३. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.०४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)