नाशिक – शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात (१६ व १७ नोव्हेंबर) २७३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २८५ एवढे कोरोनामुक्त झाले. तसेच, एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९७ हजार ३११ झाली आहे. ९३ हजार ०७८ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ४९७ जण उपचार घेत आहेत.
गेल्या दोन दिवसातील नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १९९, ग्रामीण भागातील ६०, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील ७ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार ३४९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४२१. पूर्णपणे बरे झालेले – ६१ हजार ८१६. एकूण मृत्यू – ८८६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६४७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ९६९. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ६०३. एकूण मृत्यू – ६३९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ७२७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.१२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २३०. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९५०. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी