नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (११ जानेवारी) १९७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २७८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २् जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १२ हजार ६७५ झाली आहे. १ लाख ९ हजार ०७३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ५८९ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३२, ग्रामीण भागातील ५१, मालेगाव शहरातील १० तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, २ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार ०१०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४६२. पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार ०४५. एकूण मृत्यू – ९९४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९७१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.३४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ९५०. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ६९०. एकूण मृत्यू – ७९५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४६५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१८
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६५२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३३६. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी