नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (११ डिसेंबर) २६२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २२० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ०४ हजार ७९६ झाली आहे. ९९ हजार ४०६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ५३८ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १९१, ग्रामीण भागातील ६५, मालेगाव शहरातील २ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६८ हजार ९०७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६८६. पूर्णपणे बरे झालेले – ६५ हजार ८३६. एकूण मृत्यू – ९३०. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार १४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.५४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ५४१. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ६२१. एकूण मृत्यू – ७०६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २१४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४२०. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०९८. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)