नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२८ नोव्हेंबर) २५६ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १८५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ४२८ झाली आहे. ९५ हजार ८११ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८३२ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १२३, ग्रामीण भागातील ११५, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. तर, नाशिक ग्रामीणमध्ये ३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६६ हजार २५३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५१२. पूर्णपणे बरे झालेले – ६३ हजार ८५४. एकूण मृत्यू – ९०२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ४९७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.३८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २९ हजार ०२५. पूर्णपणे बरे झालेले – २७ हजार १५८. एकूण मृत्यू – ६६९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १९८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.५७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ३१५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०३१. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.४२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी