नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२२ नोव्हेंबर) ३१९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २५२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९८ हजार ३९६ झाली आहे. ९४ हजार ०७९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७६१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ५५६ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १८०, ग्रामीण भागातील १३१, मालेगाव शहरातील ३ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६५ हजार ००३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४१२. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ५९६. एकूण मृत्यू – ८९४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५१३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.३०
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ३५१. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ७५५. एकूण मृत्यू – ६५५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.३७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २६२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ००५. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.९७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी