नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (२७ डिसेंबर) २०७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २४६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ९ हजार ११९ झाली आहे. १ लाख ४ हजार ८१७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ३५२ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३४, ग्रामीण भागातील ६८ जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, ग्रामीण भागातील २ आणि जिल्हा बाह्य २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७१ हजार ६५७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५५९. पूर्णपणे बरे झालेले – ६९ हजार ३९८. एकूण मृत्यू – ९६९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार २९०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.८५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३१ हजार ९२६. पूर्णपणे बरे झालेले – ३० हजार २८२. एकूण मृत्यू – ७५८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८८६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.८५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५४४. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २११. एकूण मृत्यू – १७४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)