नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (५ डिसेंबर) १९२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २३५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ११ हजार २६४ झाली आहे. १ लाख ७ हजार ५४३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ७३० जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३२, ग्रामीण भागातील ५३, मालेगाव शहरातील ३ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७३ हजार ०७७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४४२. पूर्णपणे बरे झालेले – ७१ हजार ००५. एकूण मृत्यू – ९८६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०८६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.१६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ५४३. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार २९३. एकूण मृत्यू – ७८१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४६९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६१२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २७३. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १६४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.६५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी