नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (२९ डिसेंबर) १५३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २३५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ९ हजार ४८८ झाली आहे. १ लाख ५ हजार ५४९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ९७७ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ९७, ग्रामीण भागातील ४८, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ७ मृतांमध्ये नाशिक शहरातील २, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७१ हजार ९१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८८. पूर्णपणे बरे झालेले – ६९ हजार ६२८. एकूण मृत्यू – ९७२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ३१४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.८२
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ०२६. पूर्णपणे बरे झालेले – ३० हजार ७६१. एकूण मृत्यू – ७६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४९९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५५०. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २२४. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी