नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (८ जानेवारी) १८१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २३४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १२ हजार २० झाली आहे. १ लाख ८ हजार ३६६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ००८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ६४६ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १२०, ग्रामीण भागातील ५४, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील ४ जणाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७३ हजार ५८१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८२. पूर्णपणे बरे झालेले – ७१ हजार ६०३. एकूण मृत्यू – ९९३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.३१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ७६१. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ४७९. एकूण मृत्यू – ७९१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४९१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.०९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६३५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३०३. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.८४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी