गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ७४५, ग्रामीण भागातील ३७४, मालेगाव शहरातील ४० तर जिल्ह्याबाहेरील १७ जणांचा समावेश आहे. तर, २४ मृतांमध्ये नाशिक शहरातील १०, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील १२, तर जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४६ हजार ८४३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४२ हजार ६५०. एकूण मृत्यू – ६७९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५१४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.०५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १७ हजार ९९१. पूर्णपणे बरे झालेले – १४ हजार ४८५. एकूण मृत्यू – ३९१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ११५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८०.५१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ५६५. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ८६७. एकूण मृत्यू – १५१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५४७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८०.४२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी