नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (२३ नोव्हेंबर) ३२५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २२३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात अवघ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९८ हजार ९५४ झाली आहे. ९४ हजार ४७६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७६६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७१२ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २०९, ग्रामीण भागातील ९८, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील ११ जणांचा समावेश आहे. तर, ग्रामीण भागातील एका व्यक्तीचा सोमवारी मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६५ हजार ३६५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४५०. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ८६८. एकूण मृत्यू – ८९७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ५१८. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ८६७. एकूण मृत्यू – ६५७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९९४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.२१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २७२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ००७. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.८०
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी