नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (१३ डिसेंबर) २२१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १७९ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ५ हजार ३३५ झाली आहे. ९९ हजार ९५९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ८६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ३ हजार ५१२ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १२२, ग्रामीण भागातील ९०, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ४ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६९ हजार २१३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६१२. पूर्णपणे बरे झालेले – ६६ हजार ०७६. एकूण मृत्यू – ९३३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार २०४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.४७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३० हजार ७३९. पूर्णपणे बरे झालेले – २८ हजार ८९३. एकूण मृत्यू – ७१५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १३१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.९९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ४५१. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार १२७. एकूण मृत्यू – १७२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७२
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)