नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (२० नोव्हेंबर) ३०१ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २२१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९८ हजार ०७७ झाली आहे. ९३ हजार ८२७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ४९५ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६८, ग्रामीण भागातील ११८, मालेगाव शहरातील ११ तर जिल्ह्याबाहेरील ४ जणांचा समावेश आहे. तर, ८ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६४ हजार ८२३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४३२. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ४०८. एकूण मृत्यू – ८९३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५२२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.५७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार २२०. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ६९९. एकूण मृत्यू – ६५०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८७१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.६१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २५९. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ००२. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.९७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी