नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१० नोव्हेंबर) २४० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २१८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९५ हजार ७४४ झाली आहे. ९१ हजार २३६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८०१ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३५, ग्रामीण भागातील ९१, मालेगाव शहरातील ५ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. तर, ६ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील २, तर जिल्हा बाह्य १ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार ३१३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५९१. पूर्णपणे बरे झालेले – ६० हजार ६७५. एकूण मृत्यू – ८७६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७६२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.८३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ४९७. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९५३. एकूण मृत्यू – ६२२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९२२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.३८
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १९८. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९१९. एकूण मृत्यू – १७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी