नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (९ जानेवारी) २७३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २१६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १२ हजार २९३ झाली आहे. १ लाख ८ हजार ५८२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ७०१ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७९, ग्रामीण भागातील ७८, मालेगाव शहरातील ६ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. तर, नाशिक ग्रामीण मध्ये २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७३ हजार ७६०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४६२. पूर्णपणे बरे झालेले – ७१ हजार ७३३. एकूण मृत्यू – ९९३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १०३४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.२५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ८३९. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ५५७. एकूण मृत्यू – ७९३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४८९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६४१. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३०६. एकूण मृत्यू – १७५
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १६०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.७८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी