नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (१० जानेवारी) १८५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २१३ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ग्रामीण भागात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १२ हजार ४७८ झाली आहे. १ लाख ८ हजार ७९५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ६७२ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ११८, ग्रामीण भागातील ६०, मालेगाव शहरातील १ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७३ हजार ८७८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४६४. पूर्णपणे बरे झालेले – ७१ हजार ८६३. एकूण मृत्यू – ९९३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०२२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.२७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ८९९. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ६१७. एकूण मृत्यू – ७९४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४८८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६४२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३२१. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.०८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी