नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (८ नोव्हेंबर) १५३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २०० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९५ हजार ५०४ झाली आहे. ९० हजार ९९६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८०७ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १०१, ग्रामीण भागातील ४४, मालेगाव शहरातील ७ तर जिल्ह्याबाहेरील १ जणांचा समावेश आहे. तर, २ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार १७८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ६१२. पूर्णपणे बरे झालेले – ६० हजार ४७०. एकूण मृत्यू – ८७५. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ८३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.७१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ४०६. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९४२. एकूण मृत्यू – ६२०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.६६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १९३. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८९७. एकूण मृत्यू – १६८.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १२८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी