नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (२२ सप्टेंबर) तब्बल १ हजार ९८८ कोरोनामुक्त झाले. तर १ हजार १५४ नवे बाधित झाल्याचे समोर आले. गेल्या २४ तासात एकूण १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ६६ हजार २१७ झाली आहे. ५६ हजार ५८९ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २०५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ८ हजार ४२३ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ९०६, ग्रामीण भागातील २२१, मालेगाव शहरातील २१ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. तर, १५ मृतांमध्ये नाशिक शहरातील १२, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४५ हजार ३१२. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ३९ हजार ९७०. एकूण मृत्यू – ६६२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४ हजार ६८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८८.२१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १७ हजार ३५. पूर्णपणे बरे झालेले – १३ हजार ५८५. एकूण मृत्यू – ३६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ८४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७९.७५
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ४७०. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ७५९. एकूण मृत्यू – १५०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५६१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.५१
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी