नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (२० सप्टेंबर) १ हजार ४९५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ९४० एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ६४ हजार २ झाली आहे. ५३ हजार २०१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ९ हजार ६२८ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १०४५, ग्रामीण भागातील ३९३, मालेगाव शहरातील ४० तर जिल्ह्याबाहेरील १७ जणांचा समावेश आहे. तर, १८ मृतांमध्ये नाशिक शहरातील ६, मालेगाव शहरातील ६ आणि ग्रामीण भागातील ६ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४३ हजार ८११. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ३७ हजार ५२१. एकूण मृत्यू – ६४२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५ हजार ६४८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८५.६४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १६ हजार ३८५. पूर्णपणे बरे झालेले – १२ हजार ७४६. एकूण मृत्यू – ३५९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार २८०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.७९
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ४२०. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ६६७. एकूण मृत्यू – १४६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६०७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७७.९८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी