नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (२५ नोव्हेंबर) १८९ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर २९५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९९ हजार ३८१ झाली आहे. ९४ हजार ८४६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ७६२ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १७०, ग्रामीण भागातील १०९, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील १, ग्रामीण भागातील २ आणि जिल्हा बाह्य १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६५ हजार ६३४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५१२. पूर्णपणे बरे झालेले – ६३ हजार १३४. एकूण मृत्यू – ८९९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ६०१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१९
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ६५८. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ९५७. एकूण मृत्यू – ६६१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ०४०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.०६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २८०. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ०१२. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.७४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी