नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (११ नोव्हेंबर) २०० जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १८५ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९५ हजार ९४४ झाली आहे. ९१ हजार ४२१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ८१२ जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १५०, ग्रामीण भागातील ३९, मालेगाव शहरातील ६ तर जिल्ह्याबाहेरील ५ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि मालेगाव शहरातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६३ हजार ४६३. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ५६६. पूर्णपणे बरे झालेले – ६० हजार ८४०. एकूण मृत्यू – ८७८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७४५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९५.८७
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २७ हजार ५३६. पूर्णपणे बरे झालेले – २५ हजार ९६८. एकूण मृत्यू – ६२४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.३१
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २०४. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ९२२. एकूण मृत्यू – १७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ११२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.२९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी