नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवारी (१३ जानेवारी) २०५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १८१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १२ हजार ९९४ झाली आहे. १ लाख ९ हजार ५४६ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत २ हजार ०१८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ४३० जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १४६, ग्रामीण भागातील ५२, मालेगाव शहरातील ४ तर जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. तर, नाशिक शहरात २ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७४ हजार २४७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४४२. पूर्णपणे बरे झालेले – ७२ हजार ३५४. एकूण मृत्यू – ९९८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८९५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.४५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३३ हजार ०२४. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ८४३. एकूण मृत्यू – ७९६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३८५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.४२
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ६५७. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ३३८. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.१५