नाशिक – शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (२४ नोव्हेंबर) १३२ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १८१ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९९ हजार ०८६ झाली आहे. ९४ हजार ६५७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ६६० जण उपचार घेत आहेत.
मंगळवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ९९, ग्रामीण भागातील ३१ आणि जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, ३ मृतांमध्ये नाशिक शहरातील १ आणि ग्रामीण भागातील २ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६५ हजार ४६४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४१२. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ९९९. एकूण मृत्यू – ८९८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५६७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ५४९. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ९१२. एकूण मृत्यू – ६५९.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.२७
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २७२. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ००७. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.८०
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी