नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (२६ सप्टेंबर) १ हजार ४२४ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ७५८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ७१ हजार ७२१ झाली आहे. ६३ हजार ०९७ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ७ हजार ३२९ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ८७८, ग्रामीण भागातील ४९५, मालेगाव शहरातील ३३ तर जिल्ह्याबाहेरील १८ जणांचा समावेश आहे. तर, २० मृतांमध्ये नाशिक शहरातील १० आणि ग्रामीण भागातील १० जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४८ हजार ७७८. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ४४ हजार ५७४. एकूण मृत्यू – ७०४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.३८
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १८ हजार ८६१. पूर्णपणे बरे झालेले – १५ हजार २४८. एकूण मृत्यू – ४१२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार २०१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८०.८४
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ६२५. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ९५७. एकूण मृत्यू – १५१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५१७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८१.५७
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी