नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (३ जानेवारी) २५७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १७४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख १० हजार ८८२ झाली आहे. १ लाख ७ हजार १५० जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ७४९ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १६८, ग्रामीण भागातील ७३, मालेगाव शहरातील ८ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, ९ मृतांमध्ये नाशिक शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ७ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७२ हजार ८४९. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८२. पूर्णपणे बरे झालेले – ७० हजार ७६४. एकूण मृत्यू – ९८२. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १०३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.१४
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार ४१०. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार १५६. एकूण मृत्यू – ७७७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५९६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २७१. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १५०. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९३
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी