नाशिक – शहरासह जिल्ह्यात रविवारी (२२ नोव्हेंबर) २३३ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १७४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९८ हजार ६२९ झाली आहे. ९४ हजार २५३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ७६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या २ हजार ६११ जण उपचार घेत आहेत.
रविवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १५३, ग्रामीण भागातील ६९, मालेगाव शहरातील ३ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६५ हजार १५६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४२१. पूर्णपणे बरे झालेले – ६२ हजार ७२०. एकूण मृत्यू – ८९७. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ५३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.२६
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २८ हजार ४२०. पूर्णपणे बरे झालेले – २६ हजार ८००. एकूण मृत्यू – ६५६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ९६४. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.३०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार २६५. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार ००५. एकूण मृत्यू – १७१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ८९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.९०
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी