नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (१७ सप्टेंबर) १ हजार ५९७ जण नवे कोरोनाबाधित झाले. तर १ हजार ७१८ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ५९ हजार ५८५ झाली आहे. ४८ हजार १२३ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १० हजार ३३६ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १०२१, ग्रामीण भागातील ५४६, मालेगाव शहरातील २२ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, १९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ७, मालेगाव शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४० हजार ७३५. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार १५६. पूर्णपणे बरे झालेले – ३४ हजार १७. एकूण मृत्यू – ६२१. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६ हजार ९७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८३.५१
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १५ हजार २२६. पूर्णपणे बरे झालेले – ११ हजार २७६. एकूण मृत्यू – ३४२.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ६०८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७४.०६
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार २८८. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ५९४. एकूण मृत्यू – १३७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५५७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७८.८९
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी अशी