नाशिक – शहरासह जिल्ह्यात सोमवारी (१४ सप्टेंबर) १ हजार ५८० जण कोरोनामुक्त झाले तर १ हजार ३१७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ५४ हजार ८३३ झाली आहे. ४३ हजार २१४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १०७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १० हजार ५४६ जण उपचार घेत आहेत.
सोमवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८७६, ग्रामीण भागातील ३७३, मालेगाव शहरातील ४८ तर जिल्ह्याबाहेरील २० जणांचा समावेश आहे. तर, ९ मृतांमध्ये नाशिक शहरातील ५, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३५ हजार ५९७. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ९१७. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ६५. एकूण मृत्यू – ५९९. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५ हजार ९३३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.६३.
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १३ हजार ७४८. पूर्णपणे बरे झालेले – ९ हजार ४८९. एकूण मृत्यू – ३२१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ९३८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ६९.०२.
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार २०६. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ४४०. एकूण मृत्यू – १२७.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६३९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७६.११.
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी अशी
नाशिक ५७४
बागलाण २९९
चांदवड १८०
देवळा ८८
दिंडोरी ९९
इगतपुरी १३५
कळवण ७०
मालेगाव ३८०
नांदगाव ४७१
निफाड ८७८
पेठ ९
सिन्नर ५८१
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर ५८
येवला ११४