नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१२ सप्टेंबर) तब्बल १५६९ नवे कोरोना बाधित आढळून आले. १०६६ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर १५ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५२ हजार ३२९, कोरोनामुक्तांची ४० हजार ८६४, एकूण मृत्यू १०५० तर सध्या उपचार घेणाऱ्यांची संख्या १० हजार ४१५ एवढी आहे.
शनिवारच्या नव्या बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १०५०, ग्रामीण भागात ४४६, मालेगाव शहरात ७२ तर जिल्ह्याबाहेरील १ जणाचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १०५० झाली आहे. त्यात नाशिक शहरातील ५, ग्रामीण भागातील ९ आणि जिल्ह्याबाहेरील १ व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ७८.०९ एवढी आहे. नाशिक शहरात हेच प्रमाण ८१.४३ टक्के एवढे आहे.
नाशिक शहर
शनिवारचे कोरोना बाधित- १ हजार ५०. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र- १ हजार ९१७. एकूण कोरोना रुग्ण- ३५ हजार ९७४. एकूण मृत्यू – ५८९. घरी सोडलेले रुग्ण- २९ हजार २९४. उपचार घेत असलेले रुग्ण- ६ हजार ९१.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण
नाशिक ग्रामीण ३६७१
जिल्हाबाह्य ११
मालेगाव शहर ६४२
तालुकानिहाय आकडेवारी अशी
नाशिक ५४३
बागलाण ३३१
चांदवड १७८
देवळा ९३
दिंडोरी १०८
इगतपुरी १४२
कळवण २४
मालेगाव ३८३
नांदगाव ३९९
निफाड ७८४
पेठ ८
सिन्नर ५३२
सुरगाणा २
त्र्यंबकेश्वर ५४
येवला ९०