………नाशिक शहर
उपचार घेत असलेले पॅाझिटिव्ह रुग्ण – ५ हजार ८६३
एकूण कोरोनाबाधित – ३४ हजार ९२४
डिस्जार्च देण्यात आलेले रुग्ण – २८ हजार ४७७
एकूण मृत्यू – ५८४
आतापर्यंतचे प्रतिबंधित क्षेत्र – १ हजार ९१७
नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (११ सप्टेंबर) दिवसभरात १५५१ नवे कोरोनाबाधित आढळून आले. ११३० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली तर १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील बाधितांचा एकूण आकडा ५० हजार ७६० झाला आहे. ३९ हजार ७९८ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. १०३५ बळी आतापर्यंत गेले असून सध्या ९ हजार ९२७ रुग्ण उपचार घेत आहेत.
शुक्रवारी दिवसभरातील नव्या बाधितांमध्ये नाशिक शहरातील १०८१, ग्रामीण भागातील ४३७, मालेगाव शहरातील ३१ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे. तर, गेल्या २४ तासातील मृत्यूंमध्ये नाशिक शहरातील ८, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ५ जणांचा समावेश आहे. शहरासह जिल्ह्यात बरे होणाऱ्यांची टक्केवारी ७८.४० टक्के एवढी आहे.