नाशिक – शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१ जानेवारी) २२७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १५४ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या १ लाख ३ हजार ३४६ झाली आहे. १ लाख ६ हजार ६३२ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ९७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १ हजार ७४२ जण उपचार घेत आहेत.
शुक्रवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १५३, ग्रामीण भागातील ६०, मालेगाव शहरातील ६ तर जिल्ह्याबाहेरील ८ जणांचा समावेश आहे. तर, ४ मृतांमध्ये नाशिक शहरातील ३ आणि ग्रामीण भागातील १ जणाचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ७२ हजार ५०६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ४८२. पूर्णपणे बरे झालेले – ७० हजार ४२६. एकूण मृत्यू – ९७८. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार १०२. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९७.१३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३२ हजार २५०. पूर्णपणे बरे झालेले – ३१ हजार ००२. एकूण मृत्यू – ७७०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ४७८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९६.१३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार ५७६. पूर्णपणे बरे झालेले – ४ हजार २५४. एकूण मृत्यू – १७५.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १४७. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९२.९६
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी (लवकरच)